नगर जिल्ह्यात बनावट नोटा छापण्याचा कारखाना....पोलिसांनी लावला शोध

नगर जिल्ह्यात बनावट नोटा छापण्याचा कारखाना....पोलिसांनी लावला शोध नगर -    मागील आठवड्यात टाकळी ढोकेश्वर येथील स्टेट बँकेचे एटीएम मशिन चोरण्याचा प्रयत्न तीन चोरट्यांनी केला होता. ते चोरटे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जेरबंद केले होते. त्यांतील एक आरोपी विकास रोकडे (वय १९, रा. वडगाव सावताळ) हा बनावट नोटा छापत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. 

  तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक हनुमान उगले यांनी आरोपीच्या वडगाव सावताळ येथील घराची झडती घेतली. त्या वेळी रोकडेच्या घरात पाचशे व शंभर रुपयांच्या बनावट चलनी नोटा सापडल्या, तसेच रंग, छपाई यंत्र व कागद, कटर, कात्री आदी साहित्य मिळून आले. हे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. नोटा छापण्याच्या कामात त्याचे आणखी कोण साथीदार आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत.

आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने, त्याने छापलेल्या नोटा कोठे दिल्या, याची विचारपूसही पोलिसांनी सुरू केली आहे. कोणाची बनावट चलनी नोटांद्वारे फसवणूक झाली असेल, तर संबंधितांनी पारनेर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 
 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post