आमच्यावर झालेले आरोप हे धादांत खोटे - किरण काळे

 किरण काळे यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे आमच्यावर झालेले आरोप हे धादांत खोटे असून ही माझी व माझ्या सहकार्‍यांची अग्निपरीक्षा आहे. या अग्नी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आम्ही निर्भिडपणे तयार आहोत. कारण की आम्ही स्वच्छ आहोत. 

मी व माझ्या काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही सहकार्याने काल आयटीपार्क ची पाहणी करत असताना कोणत्याही महिलेचा विनयभंग, सदर महिलांना शिवीगाळ, धक्काबुक्की, दमदाटी असे कृत्य केलेले नाही. 

आयटी पार्कच्या नावाखाली त्या ठिकाणी कॉल सेंटर चालवले जात आहे. सदर कॉल सेंटरमध्ये आम्ही जबरदस्तीने प्रवेश केलेला नाही. सदर प्रवेश हा त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हरकत नसल्यामुळेच झालेला आहे. जर तशी त्यांना हरकत असती तर त्यांनी तशा पद्धतीने आम्हाला सुचना केल्या असत्या आणि आम्ही त्या सूचनांचे पालन केले असते. मात्र त्यांनी त्या ठिकाणी आमच्याशी योग्य पद्धतीने संवाद साधला आणि कोणत्याही प्रकारची बाचाबाची अथवा ज्या पद्धतीने फिर्यादी मध्ये उल्लेख केला आहे तशी घटना घडलेली नाही. 

आम्ही सदर आयटी पार्कची पाहणी करत असताना कोणत्याही महिला अथवा पुरुष शौचालयांमध्ये प्रवेश केलेला नाही. 

काल किरण काळे आणि काँग्रेस  टीमने आयटी पार्कच्या केलेल्या पाहणीचे सर्व व्हिडिओ फुतेज पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बांधवांना दाखवले. आम्ही पोलिसांची भेट घेऊन त्यांना देखील हे सर्व फुटेज उपलब्ध करून देणार असून त्यांच्याकडे कंपनीने दिलेले फुटेज आणि आमचे फुटेज त्याची पडताळणी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी लवकरच होईल आणि नगरकरा समोर सत्य काय आहे ते येईल. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही ! आमचा कायदा सुव्यवस्था यंत्रणेवर आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. 


सदर भगिनीवर राष्ट्रवादीच्या आमदार यांनी तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दबाव टाकून खोटी एफआयआर त्याठिकाणी देण्यासाठी भाग पाडले आहे.आमची पोलीस प्रशासनाबद्दल कोणत्याही प्रकारची तक्रार नसून पोलिसांवर  राष्ट्रवादीच्या आमदारांनी आणि त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी दबाव आणल्यामुळे पोलिसांचा ही कदाचित नाईलाज झाला असावा.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post