मोठी बातमी...करोनावर रामबाण 'औषध' मिळाले! चार दिवसात रूग्ण 'आयसीयु'तून बाहेर

 मोठी बातमी...करोनावर रामबाण औषध मिळाले ?  चार दिवसात रूग्ण आयसीयुतून बाहेरअबूधाबी: संयुक्त अरब अमिरातीमध्ये करोनावरील औषध शोधले असल्याचा दावा करण्यात येत आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये करोनाबाधितांवर यशस्वी उपचार होत असल्याचे समोर आले आहे. अॅण्टी व्हायरल औषध Sotrovimab च्या वापराने लोकांकडून विषाणूला मात देण्यात येत आहे. या नव्या औषधामुळे गंभीर रुग्ण बरे होत असल्याचे म्हटले जात आहे.

संयुक्त अरब अमिरातीमधील ३६ वर्षांचा सईद अल अमेरी याने खलीज टाइम्ससोबत बोलताना म्हटले की, घरी विलगीकरणात असताना तीव्र ताप, डोके दुखी, अंगदुखी आदी लक्षणे आढळली. त्यानंतर मला शेख खलीफा मेडिकल सिटीमधील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तेथील उपचारादरम्यान Sotrovimab औषध देण्यात आले. अबूधाबीतील आरोग्य विषयक कंपनी 'सेहा'ने सांगितले की, सईद यांना चार दिवसांतच डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, त्यानंतर त्यांची पत्नी आणि आईमध्ये करोनाची गंभीर लक्षणे दिसल्याने त्यांच्यावर उपचाराची आवश्यकता भासली. त्यांनादेखील Sotrovimab हे औषध देण्यात आले. दोघांना चार दिवसांत रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post