महात्मा गांधी व कॉंग्रेसची बदनामी...‘या’ अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल

महात्मा गांधी व कॉंग्रेसची बदनामी... अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात गुन्हा दाखल पुणे -   नेहमी चर्चेत राहणार्‍या अभिनेत्री पायल रोहतगी  विरोधात पुण्यातील शिवाजीननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  महात्मा गांधी आणि काँग्रेस परिवाराची बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी पुणे जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यावरुन पायल रोहतगी व व्हिडिओ तयार करणाºया अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी व त्यांचे कुटंबिय, काँग्रेस परीवार यांच्याविषयी खोटा बदनामीकारक व्हिडिओ तयार करुन तो सोशल मिडियावर पायल रोहतगी हिने प्रसारित केला. त्यातून हिंदु -मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. संगीता तिवारी यांनी अगोदर ही तक्रार सायबर पोलिसांकडे दिली होती. सायबर पोलिसांनी ती शिवाजीनगर पोलिसांकडे वर्ग केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post