भाजपसाठी ‘अच्छे दिन’..अज्ञातांकडून मिळाला ‘इतक्या’ हजार कोटींचा पक्षनिधी

भाजपसाठी ‘अच्छे दिन’..अज्ञातांकडून मिळाला 2642.63 कोटींचा पक्षनिधीआर्थिक वर्ष 2019-20 मध्ये भाजपला अज्ञातांकडून तब्बल 2642.63 कोटी रुपये मिळाल्याची माहिती पुढे आली आहे. या वर्षात राष्ट्रीय पक्षांना अज्ञात स्रोतांकडून मिळालेले एकूण उत्पन्न 3377.41 कोटींच्या घरात आहे. या कमाईत भाजपने बाजी मारली आहे. ‘असोसिएशन फॉर डेमोव्रेटिक रिफॉर्मस’ (एडीआर)च्या नव्या अहवालातून ही आकडेवारी उघडकीस आली आहे. 

एडीआरच्या अहवालानुसार, 2019-20च्या आर्थिक वर्षात भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकपा, कम्युनिटी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टी या 7 राष्ट्रीय पक्षांना अज्ञातांकडून भरभरून दान मिळाले. एका वर्षात या पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या 70.98 टक्के इतकी कमाई झाली. विशेष म्हणजे अज्ञातांकडून मिळालेल्या एकूण पैशांमध्ये एकटय़ा भाजपला 78.24 टक्के लाभ झाला. भाजपने या आर्थिक वर्षात 2642.63 कोटींचे उत्पन्न अज्ञात स्रोतांकडून मिळाल्याचे जाहीर केले, तर काँग्रेसने 526 कोटी रुपये अज्ञात स्रोतांकडून प्राप्त झाल्याचे घोषित केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post