गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी यांची निवड , भाजपच्या बैठकीत निर्णय

 भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री, भाजपच्या बैठकीत निर्णयगांधीनगर : गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली आहे. भाजप नेते विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. मुख्यमंत्रीपदाचा कारभार नेमका कोणाकडे सोपवला जाईल हे ताडण्यासाठी राजकीय जाणकारांकडून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची आज बैठक झाली. या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावावर एकमत झालं. आता पटेल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून त्याची कार्यक्रमपत्रिका लवकरच जाहीर केली जाणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post