नगर तालुक्यातील ८ सोसायट्यांच्या नोव्हेंबर मध्ये निवडणुका

 नगर तालुक्यातील ८ सोसायट्यांच्या नोव्हेंबर मध्ये निवडणुकानगर   महापालिका कर्मचारी सोसायटी , जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटींसह नगर तालुक्यातील ८ सेवा संस्थाच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असुन या संस्थाच्या निवडणुका नोव्हेंबर मध्ये होत आहेत. निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्यां  प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे .बाजार समिती निवडणूकिसाठी या निवडणुकीला महत्त्व असणार आहे.

कोरोना मुळे या संस्थाच्या निवडणुका लांबल्या होत्या . आता नगर तालुका उपनिबंधक ( सहकार ) यांनी नव्याने या संस्थाच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू केली आहे . याबाबतचा नवा अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे . त्यानुसार या संस्थाच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या तयार करण्याची मुदत ३१ ऑगष्ट पर्यत होती . या मतदार याद्या चार प्रतित १७ सप्टेंबरपर्यत नगर तालुका उपनिबंधकांकडे जमा करण्याचे आदेश संबधीत संस्थाना देण्यात आले होते .

नगर तालुक्यातील उक्कडगाव , हिवरेबाजार , जांब , बारदरी, देऊळगाव सिध्दी ,दरेवाडी या , गावातील सेवा संस्थासह नगर महापालिका कर्मचारी पतसंस्था , जि .प. कर्मचारी पतसंस्था या सहकारी संस्थाच्या निवडणुका आता पहिल्या टप्यात होणार आहेत . नगर तालुक्यातील ३ सेवा संस्थाच्या निवडणुका याआधीच झाल्या आहेत . आता सेवा संस्था निवडणुकासाठी ६ टप्पे करण्यात आले असुन पहिल्या टप्प्यातील निवडणुकांची प्रक्रिया नव्याने सुरू करण्यात आली आहे . दर दोन महिन्यांच्या अवधीनंतर निवडणुकांचा टप्पा तयार करण्यात आला आहे . प्रारूप मतदार याद्या तालुका उपनिबंधाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे पुढील कार्यवाही साठी पाठवण्यात येणार आहेत . यानंतर त्या याद्यांवर हरकती , प्रसिद्धी  , याद्यांना अंतिम प्रसिध्दी या कार्यवाहीसाठी वेळ लागणार असल्याने ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकांचा कार्यक्रम प्रसिद्ध होईल . साधारण दिवाळीतच या संस्थाच्या निवडणुकांचा बार उडणार आहे .आगामी नगर बाजार समिती निवडणुकांच्या पाश्वभुमिवर या निवडणुका होत असल्याने या निवडणुकांना राजकीय दृष्टया महत्त्व येणार आहे .यामुळे तालुक्याचे राजकारण ढवळुन निघणार आहे .

 के.आर. रत्नाळे ( नगर तालुका उपनिबंधक ( सहकार )-सहा टप्प्यात होणार निवडणूका पाहिल्या टप्यातील आठ सोसायट्याच्या निवडणुका लागल्या आहेत. त्याच्या मतदार याद्या सादर करण्यासाठी पत्र व्यवहार केला आहे. त्या याद्या जिल्हाला पाठवणार आहे . या या प्रसिद्धी , हरकती मान्यता याला थोडा वेळ लागणार आहे . ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडयात निवडणुकीचा कार्यक्रम लागणार आहे . एकूण सहा टप्पे आहे . पहिल्या टप्यामधल्या ११ सोसायटी  निवडणुका पैकी कोर्ट आदेशानुसार 3 सेवा सोसायटी निवडणूका पार पडल्या आहेत.   दर दोन महिन्यानी निवडणुकीचा टप्पा असणार  आहे .


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post