भंडारदरा धरण ओव्हरफ्लो नदीकाठच्या गावांना दिला इशारा

 भंडारदरा धरण ओव्हरफ्लो नदीकाठच्या गावांना दिला इशारा
भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पर्चन्यमानामुळे धरणाचा पाणीसाठा आज दि.१२/०९/२०२१ रोजी  सकाळी ६:०० वाजता ९९% झालेला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक बघता धरण साधारणत: ११ वा. पर्यंत पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता असल्याने ११-११:३० दरम्यान भंडारदरा धरणातून ३००० - ४००० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे. धरणातील पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होऊ शकते. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या रहीवाशांनी आपली तसेच आपल्या पशुधनाची व शेती अवजारांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

- कार्यकारी अभियंता 

अहमदनगर पाटबंधारे विभाग

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post