सुधिर भद्रे यांची भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाच्या अहमदनगर जिल्हा संघटक पदी निवड

 सुधिर राजाराम भद्रे यांची भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन  न्यासाच्या अहमदनगर जिल्हा संघटक पदी निवड   -  अशोक सब्बन           


    

    भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाच्या जिल्हा संघटक पदी श्री . सुधीर भद्रे यांची निवड केल्याचे पत्र मा .अण्णा हजारे यांनी दिल्याची माहिती जनआंदोलनाचे राज्य सचिव श्री. अशोक सब्बन यांनी दिली आहे . 

नुकतीच राळेगणसिद्धी येथे माजी जिल्हाध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक झाली . बैठकीत राज्य स्तरावर मजबूत संघटन बांधणी करण्याचा विचार करून विविध सामाजिक व जनहिताच्या प्रश्नावर लोकशिक्षण, लोकजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला . 

    पूर्वी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे ३३ जिल्ह्यातील २५२ तालुक्यात संघटन होते . त्यामुळे  सरकारकडून जनहिताचे दहा कायदे करून घेता आले .अशाच प्रकारे आताही जनहिताच्या कायद्यांसाठी मोठे जनआंदोलन उभारण्याचा मानस बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आला .

या बैठकीनंतर मा . अण्णा हजारे व विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये श्री . सुधीर भद्रे यांची अहमदनगर जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली .

सन १९९२ मध्ये अभिनव भारतीय युवक संघटनेच्या नगर तालुका अध्यक्षपदी श्री . सुधीर भद्रे यांची  नियुक्ती श्री . अशोक सब्बन यांनी केली होती .तदनंतर त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली . वयाच्या चोविसाव्या वर्षी घाटेवाडी अल्कोहल  भ्रष्टाचार प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक(दारूबंदी) यांना काळे फासण्याचे आंदोलनात श्री . सुधीर भद्रे यांचा सक्रिय सहभाग होता .अशाच प्रकारे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या भ्रष्टाचाराबद्दल ज्येष्ठ संचालकाला काळे फासणे आंदोलन ,उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयापुढे  विविध मागण्यासाठी सत्याग्रह आंदोलन,  प्रामुख्याने सहकार न्यायालये उच्च न्यायालयाच्या कार्यकक्षेत आणणे,न्यायालयीन प्रशासकीय सुधारणा,दिंरगाई दूर करण्यासाठी धोरणात्मक बदल,माहिती अधिकार कायदा सरकारने करावा या साठी राज्यातील पहिले सत्याग्रह आंदोलन, दुर्गंधीयुक्त नाल्याचे उद्यानामध्ये रूपांतर करण्याचे काम ,अहमदनगर एसटी स्टँड वरील सार्वजनिक स्वच्छते साठी उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आंदोलन, भ्रष्ट मंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, भ्रष्ट मंत्र्यांची चिल्लर तुला,भ्रष्ट मंत्र्यांची चिंगळीमाशा बरोबर तुला, आष्टी तालुका नगर जिल्ह्याला जोडण्यासाठी चे आंदोलन ,तलाठी कार्यालयामध्ये स :शुल्क सह नि:शुल्क दरपत्रक लावण्याचे आंदोलन ,छावण्यांमध्ये होत असलेला गैरकारभार पाहता रोख स्वरूपात अनुदान देणे व चारा वाटपाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रयत्न, सहकार माहिती अधिकार कायदा व्हावा , शेतीमालाला व कांद्याला हमीभाव मिळावा, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करावी,निवडणूक काळात पूर्णतः दारुबंदी करावी, अहमदनगर जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना १३४ कोटी रुपयांचे मिळवुन दिलेले वउर्वरित अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न,अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत झालेल्या भरती प्रक्रियेतील गैरकारभार,कृषी उत्पन्न बाजार समिती - अहमदनगर मधील धान्याची अवैध कपात बंद करण्याचे  कार्य,पंचायत राज समितीच्या नावाखाली जमा करण्यात आलेल्या वर्गणीला विरोध,जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची चौकशी करून चौकशी समिती समोर प्रत्यक्ष शेतात गैरकारभार सिद्ध करून देण्याचे काम ,प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सर्वंकष चौकशी करण्याची मागणी,अहमदनगर जिल्हा क्षयरोग कार्यालयातील गैरकारभार,अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या जागेवरील अतिक्रमण काढून आयुष हॉस्पिटल उभारणी साठी आंदोलन ,शेतकऱ्यांना कर्जमाफी व वीज बिल माफीसाठी आंदोलन,मा .अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त महसूल कर्मचाऱ्यांना आंबा रोपांचे वाटप, जिल्हा न्यायालय अहमदनगर तसेच औरंगाबाद खंडपीठापुढे आंदोलन, भूमि अधिग्रहण कायद्यातील बदलांना प्रखर विरोध, कायद्याचा होत असलेला अवमान थांबवण्यासाठी पुणे विधान भवनापुढे व महसूल आयुक्त कार्यालयापुढे आंदोलन ,जिल्हा बँक निवडणूकीत एक सभासद एक मत पद्धत अवलंबिण्यासाठी प्रयत्न, भूमी अभिलेख कार्यालय -कृषी विभाग कार्यालयासह अनेक कार्यालयातील  भ्रष्टाचार शोधून अधिकाऱ्यांवर कारवाई ,जुने तोफखाना पोलीस स्टेशन पाडण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका , ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री शेतकऱ्यांना किमान चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांइतका पगार देण्यासाठी आंदोलन, प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसविण्यासाठी प्रयत्न, सर्व शासकीय कर्मचारी -अधिकाऱ्यांचे मत्ता व दायित्व प्रपत्र दर पाच वर्षांनी भरून तपासून घेण्यासाठी आंदोलन, माहिती अधिकार कायद्यात अयोग्य बदल होऊ नये यासाठी रेल्वे रोको आंदोलन,अशा विविध आंदोलनांमध्ये श्री. सुधीर भद्रे यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. विविध आंदोलनांमध्ये त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून अनेक कोर्ट केसेसही झालेल्या आहेत . विशेष म्हणजे आंदोलननामधील त्यांच्या आक्रमक सहभागामुळे त्यांना अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव सुद्धा शासनाकडे सादर करण्यात आला होता .

     नगर तालुका पंचायत समितीच्या सदस्यपदी असताना त्यांनी गणातील  गावातून निघणाऱ्या सर्व रस्त्यांच्या कडेला केलेली वृक्ष लागवड २० वर्षानंतर आजही पर्यावरणाचा समतोल राखत आहे .चिचोंडी पाटील गावातून निघणाऱ्या प्रत्येक रस्त्याच्या कडेला जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचे हौद  आजही सुस्थितीत आहेत . ओल्या दुष्काळामध्ये नगर तालुक्यातील जनतेला पीकनुकसान भरपाई पोटी कोट्यावधी रुपयांचे अनुदान चेकद्वारे त्यांनी खात्यावर जमा करून दिले आहे तर कोरड्या दुष्काळामध्ये पिण्याचे पाण्याचे तसेच मजुरांच्या हाताला कामाचे त्यांनी सुयोग्य नियोजन केले आहे .नगर तालुका मतदार संघाचे विभाजन / त्रिभाजन होऊ नये ,दूध उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव मिळावा ,शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळावा, तालुक्याच्या पाझर तलावातील गाळ शेतकऱ्यांच्या शेतात पसरवावा , पिक विमा  योजनेमधून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठीची आंदोलनेही पंचायत समिती सदस्य पदाचा कार्यकाळामध्ये त्यांनी केलेली आहेत .

महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला बांधबंदिस्ती करण्याची सुरुवात चिचोंडी पाटील गावामधून त्यांनी सर्वप्रथम केली आहे, जनावरांसाठी दुष्काळी परिस्थितीत छावणी काढण्याची मागणी महाराष्ट्रात सर्वप्रथम त्यांनी केली होती .

 मजुरांच्या मजुरी मध्ये होणारा भ्रष्टाचार टाळण्यासाठी मजुरांचे पैसे रोख स्वरूपात न देता त्यांच्या खात्यावर जमा करण्याची सर्वप्रथम मागणी त्यांनी केली होती.

  पंचायत समिती कार्य काळामध्ये गणात सर्वाधिक कामे करण्याचा त्यांचा लौकिक होता . यामध्ये  सर्वाधिक घरकुले, सर्वाधिक  शिलाई मशीन, पिठाची गिरण, सायकल,  वाचनालयांना साहित्य व पुस्तके, भजनी मंडळांना साहित्य , वृक्षलागवड, माणसांना व जनावरांना पिण्याचे पाण्यासाठी हौद बांधकाम , वीज रोहित्र , बंधारे , रस्ते इत्यादी उल्लेखनीय कामे पंचायत समिती सदस्य पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी केलेली आहेत .

नगर तालुका सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी असताना अतिरिक्त उसाचे गाळप करण्यामध्ये तसेच दुष्काळी स्थिती मध्ये इतर तालुक्यातून व जिल्ह्यातून उस आणण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता . त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतातुन ऊस आणण्यासाठी रस्ते तयार करणे ,शेतकऱ्यांना उत्तम जातीचे  उसाचे बियाणे देणे, सभासदांना साखर वाटप करणे आदी अनेक बाबींमध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता .

   शेती व शेती प्रश्नांची जाण आणि आवड असल्यामुळे या पुढील काळात श्री .सुधीर भद्रे यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकरी संरक्षण कायदा,कायदा अवमान याचिका दाखल करण्याचे अधिकार देणारा कायदा आणि सामान्य जनतेसाठी सुप्रशासन निर्माण करण्यासाठी विशेष परिश्रम घेवून जिल्ह्यात संघटन मजबूत करावी अशी अपेक्षा न्यासाचे सचिव श्री . अशोक सब्बन यांनी अभिनंदन व शुभेच्छा देतांना व्यक्त केली आहे .

जिल्हा व तालुका पातळीवर संघटना वाढीसाठी चारित्र्यशील ,निस्वार्थी आणि सामाजिक व राष्ट्रीय दृष्टिकोन असणाऱ्या सहकाऱ्यांची निवड लवकरच करण्यात येणार असल्यामुळे ज्यांना आंदोलनात काम करण्याची इच्छा आहे त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन श्री . सुधीर भद्रे (9421440082) यांनी केले आहे .   गेल्या तीस वर्षापासून सुप्रशासन  होण्यासाठी सातत्याने अनेक चळवळी मध्ये सातत्याने सक्रिय  सहभागी असणारे  सुधीर भद्रे यांच्या निवडीचे जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत होत असुन कार्यकर्त्यां मधे असलेली मरगळ दूर होवून उत्साहाचे वातावरण र्निमिती होत आहे असे मत अभिनंदन करतांना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.   

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post