शिवसेनेचे स्वप्न भंगले...‘या’ महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता


 बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत बेळगाव : कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने 29 आाकड्याची मॅजिक फिगर ओलांडली आहे. भाजपने या निवडणुकीत अतिशय ताकदीने आणि आक्रमकरित्या प्रचार केला होता.  बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचं राऊतांनी बोलून दाखवलेलं स्वप्न मात्र भंगलं आहे.


या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्यामुळे निकालाची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. आमचे 30 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अखेर भाजपने बेळगाव महापालिकेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post