खळबळजनक...एकाच घरात चार सदस्यांचे मृतदेह पंख्याला लटकलेले आढळले

खळबळजनक...एकाच घरात चार सदस्यांचे मृतदेह पंख्याला लटकलेले आढळले  नवी दिल्ली :   एक प्रकरण बेंगळुरूच्या ब्यादरहल्ली भागातून समोर आलं आहे. जिथे एकाच घरात पाच सदस्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले आहेत. जेव्हा पोलिसांनी घरात प्रवेश केला, तेव्हा त्यांना घरातले चार सदस्य वेगवेगळ्या खोल्यांमध्ये छताच्या पंख्याला लटकलेले आढळले. तर नऊ महिन्यांच्या मुलीचा मृतदेह बेडवर पडलेला आढळला.


9 महिन्याच्या मुलीचा मृत्यू कुटुंबीयांच्या मृत्यूनंतर उपासमारीने झाला असावा, असा अंदाज काही रिपोर्टमधून व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अडीच वर्षांच्या मुलीला घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. तिला सध्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. भारती (51 वर्षे), सिंचन (34 वर्षे), सिंधुराणी (31 वर्षे) आणि मधुसागर (25 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. डीसीपी (पश्चिम) संजीव एम.पाटील यांनी सांगितलं की, पत्रकार हुलागुरे शंकर चार दिवसांनी घरी गेल्यावर ही घटना उघडकीस आली. शंकरने घराचा दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो उघडू शकला नाही. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला, त्यानंतर हे दृश्य पाहून तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली, अशी माहिती पोलीस अधिकारी पाटील यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, घरात प्रवेश केल्यावर चार लोकांचे मृतदेह वेगवेगळ्या खोलीत पंख्याला लटकलेले आढळले. तर एका मुलीचा मृतदेह बेडवर मृतावस्थेत आढळला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post