मोठी बातमी.. माजी मंत्री कर्डिले यांची यशस्वी शिष्टाई, नेप्ती उपबाजारात कांदा लिलाव पूर्ववत

 माजी मंत्री कर्डिले यांची यशस्वी शिष्टाई, नेप्ती उपबाजारात कांदा लिलाव पूर्ववत

अखेर कांदा लिलाव पुर्ववत - ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे आश्वासन वाराई हमाली बाबत संयुक्त मिटींग बाजार समितीचे सभागृहात मा.आ.शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे उपस्थितीत संपन्न झाली. त्यावेळी उपस्थित बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे पाटील,उपसभापती संतोष म्हस्के, हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मा.नंदकिशोर शिकरे, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बाबा सानप, बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांचे उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये दि.7/09/2021 रोजीहोणाऱ्या राज्य पातळी मिटींगमध्ये जो काय निर्णय होईल त्याबाबत दि.8/09/2021 रोजी पुन्हा नगरमध्ये मिटींग घेवून पुढील निर्णय घेण्यांत येईल. तोपर्यंत जुन्या प्रचलित पध्दतीने काम सुरु ठेवण्यांत यावे. मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या मध्यस्थिने 

असे ठरलेले आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवानी सर्व बाजार समिती सुरु असल्याने शनिवार दि.04/09/2021 रोजी कांदा लिलाव पुर्ववत सुरु राहणार आहेत. याची सर्व शेतकरी बांधवानी नोंद घ्यावी.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post