श्री अंबिका माध्य व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस सोहळा संपन्न

 श्री अंबिका माध्य व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस सोहळा संपन्न केडगाव - आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचे असेल तर शालेय जीवनातील विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन यश मिळवले पाहिजे असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी .

केडगाव येथील श्री अंबिका माध्य व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयात पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३४ वी जयंती निमित्त विद्यार्थ्याचा गुणगौरव व बक्षीस सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमप्रसगी ते बोलत होते .

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दादाभाऊ कळमकर  प्रमुख पाहुणे  जि.प. माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस होते .यावेळी  विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविण-या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

          यावेळी माजी प्राचार्य शिवाजीराव भोर,रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी तथा विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम कन्हेरकर,स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य प्रशांत कोतकर व रावसाहेब सातपुते ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक सुरेश थोरात , सूत्रसंचालन महेश ढगे व बाबासाहेब जगदाळे, आभार गुरुकुल प्रमुख कैलास आठरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी रवी तंटक ,अशोक बडवे,संदीप गाडीलकर,संदीप नवले,प्राजक्ता दामगुडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post