ऑल इंडिया मोबाईल रिटेल असोसिएशन...जिल्हाभरात ५१५ व शहरातील १८० रक्तदात्यांनी केले रक्तदान

 ऑल इंडिया मोबाईल रिटेल असोसिएशनने रक्तदानातून जोपासली सामाजिक बांधिलकी


जिल्हाभरात ५१५ व शहरातील १८० रक्तदात्यांनी केले रक्त दान


रक्तदानाची गरज ओळखून संस्था व संघटनांनी पुढे यावे - आ. संग्राम जगताप नगर   - संपूर्ण भारतभर ऑल इंडिया मोबाईल रिटेल असोसिएशनने एकाच दिवशी रक्तदानाचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे.आपला व्यवसाय सांभाळून समाजाबद्दलचे आपले कर्तव्य पार पडले कुठलाही व्यवसाय करीत असताना संस्था,संघटना स्थापन करून संघटित होण्याची खरी गरज आहे.आपण सर्व एकत्रित येऊन संकट काळामध्ये उभे राहण्यासाठी मदत होते. शहरातील व जिल्ह्यातील मोबाईल व्यवसायिकांनी एकत्रित येऊन रक्तदान करण्याचा घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

        ऑल इंडिया मोबाईल रिटेल असोसिएशनच्या वतीने बडी साजन येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना आ.संग्राम जगताप समवेत स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, कमलेशशेठ भिंगारवाला, योगेश झवर, प्रा.माणिकराव विधाते, मा.नगरसेवक संजय चोपडा, विकीशेठ जगताप,असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप, असोसिएशन चे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अजित पवार. तसेच गोरख पडोळे, मनीष चोपडा,अमित बुरा,रितेश सोनी मंडलेचा,सुमतीलाल कोठारी,यश मेहता,सुदाम वांढेकर,हिराशेठ खूपचंदाणी,दीपक गुरनीनी,उमेश धोंडे,भुपेंद्र रासने,सचिन ढवळे, संतोष बलदोटा,योगेश झवर, मारुती पवार, प्रीतम तोडकर, साजित खान आदी उपस्थित होते.

            यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप पुढे म्हणाले की, कोविड परिस्थितीमुळे सध्या रक्तदान शिबिरांचे आयोजन होत नाहीत त्यामुळे रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. इतर आजारांच्या रुग्णांसाठी रक्ताची मोठ्या  प्रमाणात गरज भासत आहे तसेच डायलेसिस रुग्णांसाठी उपचार घेत असताना रक्ताची गरज भासत असते हीच गरज ओळखून भारतभर या संघटनेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले व सर्व मोबाईल व्यवसायिकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान केले हे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

         यावेळी बोलताना संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप म्हणाले की, संपूर्ण भारतभर आमच्या संघटनेने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा संकल्प केला यामध्ये जिल्ह्यातील 515 व शहरातील 180 व्यवसायिकांनी रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडले वर्षभर संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहे असे ते म्हणाले.  यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित बुरा यांनी केले व  सूत्रसंचालन अजित पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन गोरख पडोळे यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post