स्थानिक स्व.संस्थांच्या निवडणुकीत आघाडी होणार की नाही अजित पवार म्हणाले

  स्थानिक स्व.संस्थांच्या निवडणुकीत आघाडी होणार की नाही अजित पवार म्हणालेमुंबई : राज्यभरात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी होणार की नाही असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, “जिल्हापातळीवर परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे त्या-त्या जिल्ह्याला अधिकार द्यावा. एकट्याने लढवायची की आघाडी करुन लढायची हा निर्णय जिल्हा पातळीवर व्हावा, असं माझं मत आहे. जिल्ह्या पातळीवर निर्णय घेतला तर मतविभाजन टाळून जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला यश मिळेल. स्थानिक लोक तिथे राजकारण करतात त्यांनी निर्णय घ्यावा”

1/Post a Comment/Comments

Post a Comment

Previous Post Next Post