राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित शिक्षक विक्रम अडसूळ यांना माय स्टॅम्प वितरित

 राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित शिक्षक विक्रम अडसूळ यांना माय स्टॅम्प वितरित

शिक्षण उपसंचालक श्री दिनकर टेमकर यांचे हस्ते वितरणअहमदनगर: राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने 2018 मध्ये  सन्मानित बंडगर वस्ती पाटेवाडी ता कर्जत येथील गुणवंत शिक्षक श्री विक्रम अडसूळ गुरुजी यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधत उपविभागीय डाक निरीक्षक श्री अमितजी देशमुख यांनी पोस्टाच्या मायस्टॅम्प या योजनेअंतर्गत गुरुजीचा स्वतः चा फोटो असलेला स्टॅम्प राज्याचे शिक्षण उपसंचालक श्री दिनकरजी टेमकर सर यांचे शुभहस्ते वितरित करून शिक्षकदिनी त्याचा गौरव केला. यावेळी डायटचे प्राचार्य श्री डी डी सूर्यवंशी सर,टपाल कर्मचारी संघटनेचे नेते संतोष यादव हे प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

हा कार्यक्रम अहमदनगर  एमआयडीसी मधील जिमखाना हॉल येथे राज्यभरातुन आलेल्या मोजक्या शिक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

श्री अमितजी देशमुख यांनी आपल्या मनोगतात पोस्टाच्या विविध योजनांची माहिती देत अधिकाधिक शिक्षकानी या योजना आपल्या शाळेच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात असे आवाहन करत उपस्थित शिक्षकाना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी मा श्री सूर्यवंशी साहेब,शिक्षक नेते राजेंद्र निमसे , विक्रम अडसूळ,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नारायण मंगलारम राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 2020 शिक्षक यांनी तर आभार श्री तुकाराम अडसूळ गुरुजी यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post