लग्नाला विरोध केल्याने मुलीच्या आईलाच संपविले...

लग्नाला विरोध केल्याने मुलीच्या आईलाच संपविले... कोल्हापूर: लग्नाला विरोध केल्यानं मुलीच्या आईलाच संपवल्याची धक्कादायक घटना आजरा तालुक्यातील आल्याचीवाडी येथे घडली आहे. याघटनेत मृत झालेल्या महिलेचं नाव लता परीट असं आहे. तर, आजरा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती आहे. 

  लता परीट या शेतात कामासाठी गेल्या असता तिथं त्यांचा खून करण्यात आला आहे. आजरा पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाची चक्र फिरवत आरोपी गुरुप्रसाद माडभगत याला अटक केली असून तपास सुरु आहे. लता परीट यांचा मृतदेह शवविच्छेदन करुन पोलिसांनी संबंधित महिलेच्या ताब्यात दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post