फक्त 20 रुपयासाठी मजुराची गळा चिरुन हत्या...

 

फक्त 20 रुपयासाठी मजुराची गळा चिरुन हत्या...नाशिक : नाशिकच्या पंचवटीमध्ये काल झालेल्या निर्घृण खुनाचा पोलिसांनी छडा लावला आहे. अवघ्या 20 रुपयांसाठी या आरोपीने धारदार कट्याराने गळा चिरुन मजुराची हत्या केल्याचा आरोप आहे. ऐन गणेशोत्सवात झालेल्या हत्येमुळे नाशकात एकच खळबळ उडाली होती. 

संशयित आरोपी पंडित गायकवाड उर्फ लंगड्या याने बिडी पिण्यासाठी फिरस्ता असलेल्या मजुराकडे 20 रुपये मागितले. त्याने पैसे न दिल्याचा राग आल्याने आरोपीने त्याच्या गळ्यावर वार करुन त्याची निर्घृण हत्या केली. संशयित आरोपी पंडित गायकवाडला पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मारेकऱ्यांनी तरुणाचा गळा चिरला होता. त्याच्या रक्ताचे डाग चक्क अर्ध्या किलोमीटरपर्यंत पडले होते. मृत तरुणाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. तेव्हा त्यांना जुना आडगाव नाक्यावरील रामरतन लॉज बाहेर रक्ताचे पडलेले डाग आणि काही कपडे दिसले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतला. तेव्हा त्यात पंपावर एक व्यक्ती हात धुत असल्याचे दिसले. त्या व्यक्तीची चौकशी करून पोलिस आरोपीपर्यंत पोहचले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post