हॉटेलमध्ये डोक्यात दगड घालून एकाचा खून... नगर जिल्ह्यातील घटना

हॉटेलमध्ये डोक्यात दगड घालून एकाचा खून... नगर जिल्ह्यातील घटना नगर:  नगर मनमाड महामार्गावर राहुरी नजीक एका हॉटेलमध्ये डोक्यात दगड घालून एका परप्रांतीय वेटरचा खून केल्याची घटना घडली आहे. सोनू थापा असे त्या मयत झालेल्या वेटरचे नाव आहे. शनिवारी रात्री मध्यरात्री नंतर २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

 मयत वेटरबरोबर असलेला एक नामदेव नामक वेटर पसार झाला असून तो शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील रहिवासी आहे. हे दोघेही हॉटेलमध्येच मुक्कामाला रहायचे. खुनाचे कारण अद्याप समजले नाही.

घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी संदीप मिटके व राहुरीचे पोलीस आज सकाळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली आहे. नगर- मनमाड हायवेवर हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये हा थरार झाल्याने परिसरात दहशत पसरली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post