नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून नगरमधील 'या' नेत्याची मोर्चेबांधणी.... मतदार नोंदणी अभियान राबविणार

 नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व नगर जिल्ह्यात पदवीधर मतदार नोंदणी अभियान राबविणार : विनायक देशमुखनगर: नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २०२३ साली होण्याची शक्यता असुन त्यासाठी आपण नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर जिल्ह्यात पदवीधर मतदार नोंदणी अभियान राबविणार आहोत." अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व अ.भा.काँग्रेसचे सदस्य श्री. विनायक देशमुख यांनी दिली.

या निवडणुकीत पक्षाचा उमेदवार कोण असेल याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेतील. मात्र मतदार नोंदणीचे काम प्राधान्याने सुरु करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना श्री.देशमुख म्हणाले, मी स्वत: तीन वर्षे जळगाव जिल्हा प्रभारी म्हणून काम पाहिले असुन सध्या मी धुळे जिल्हा प्रभारी म्हणून कार्यरत आहे. याशिवाय नाशिक व नंदुरबार जिल्ह्यातील अनेक निवडणुकीत मी निरीक्षक म्हणून काम केले आहे.

 अहमदनगर जिल्ह्यात मी युवक काँग्रेस अध्यक्ष, *जिल्हा काँग्रेस अध्यक्ष* अशा अनेक जबाबदारया पार पाडल्या आहेत. यानिमित्ताने आलेल्या संपर्काचा उपयोग करुन जास्तीत जास्त पदवीधर नोंदणी करणे व काँग्रेस पक्षाची ताकद वाढविणे, हा पदवीधर मतदार नोंदणी अभियानाचा* उद्देश आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post