उत्तर प्रदेश एटीएसची महाराष्ट्रात मोठी कारवाई....'धर्मांतराचे' रॅकेट चालवणारा अटकेत

 

उत्तर प्रदेश एटीएसची महाराष्ट्रात मोठी कारवाई....'धर्मांतराचे' रॅकेट चालवणारा अटकेत नाशिक, : नाशिक परिसरात धर्मांतराचं रॅकेट चालवणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश एटीएस  पथकाने धडक कारवाई करत नाशिक रोड  परिसरातून या तरुणाला अटक केली आहे. उत्तर प्रदेशच्या धर्मांतर प्रकरणात या तरुणाचा समावेश असल्याचा एटीएस ला संशय आहे.

 ATS ने नाशिक रोड परिसरात ही कारवाई केली आहे. धर्मांतराचा रॅकेट चालवणार्‍याला एटीएसने अटक केली आहे.  आतिफ उर्फ कुणाल असं या तरुणाचं नाव आहे. नाशिक रोडच्या आनंद नगर भागात हा तरुण कुणाल म्हणून वास्तव्याला होता.

आतिफच्या खात्यात परदेशातून वेगवेगळ्या खात्यांमधून तब्बल 20 कोटी रुपये जमा झाले आहे. या कारवाईमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आतिफ हा हा नाशिक रोडला डॉक्टर प्रॅक्टिस करत होता. त्याने रशियातून मेडिकलचं शिक्षण घेतलं. नाशिक रोड परिसरात इस्लामिक दवाई सेंटर चालवत होती. या ठिकाणी तो रुग्णांना, धर्मपरिवर्तनासाठी प्रवृत्त करायचा. उत्तर प्रदेशातील मौलाना कलीम सिद्दीकी याच्या तपासणीतून अतिफ उर्फ कुणालची माहिती UP ATS ला समजली. त्यानंतरही ही कारवाई करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post