दुचाकी चोरणारी मोठी टोळी गजाआड, ८ गाड्या हस्तगत

दुचाकी चोरणारी मोठी टोळी गजाआड, ८ गाड्या हस्तगतनगर:  शहरासह, उपनगरातून दुचाकींची चोरी करून विक्री  करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी कोतवाली पोलिसांनी जेरबंद  केली. गणेश देविदास नल्ला (वय 23 रा. श्रमिकनगर, पाईपलाईन रोड), हनुमंत राजेंद्र गायकवाड (वय 20 रा. मुंगुसवाडी खरवंडी ता. पाथर्डी), दीपक बाळू कांबळे (वय 26 रा. मोकाशे वस्ती, पाईपलाईन रोड) व शिवाजी सोन्याबापू साबळे (वय 31 रा. तपोवन रोड, नगर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत केल्या आहे.

पोलिसांनी सुरूवातीला गणेश नल्ला याला अटक केली. त्याने दुचाकी चोरी केल्याची कबूली देत अन्य चार साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली.

अटक केलेल्या आरोपींकडून शहर, उपनगरातून चोरलेल्या आठ दुचाकीं पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील,  अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलीस कर्मचारी बंडू भागवत, शाहीद शेख, सुमित गवळी, अभय कदम, दीपक रोहकले, आनंद दाणी, योगेश भिंगारदिवे, नितीन शिंदे, सागर पालवे, नितीन घाडगे, भारत इंगळे, सुशिल वाघेला, सुजय हिवाले, तान्हाजी पवार, कैलास शिरसाठ, प्रमोद लहारे, सोमनाथ राऊत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post