शरद पवारांनी कॉंग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे, कॉंग्रेसच्या बड्या नेत्याची खुली ऑफर

 कॉंग्रेसची अवस्था पवार म्हणतात तशी नाही, उलट शरद पवारांनीच कॉंग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे, कॉंग्रेस नेत्याची खुली ऑफरमुंबई:  ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कॉंग्रेसची अवस्था एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे, असं विधान नुकतेच केले होते. पवारांच्या या विधानाशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी असहमती दर्शविली आहे.  पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं असं खुलं निमंत्रण बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना दिलं आहे. 

बाळासाहेब थोरात यांनी मीडियाशी बोलताना शरद पवार यांना थेट काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन केलं. तसेच काँग्रेसची अवस्था जमीनदारी गेलेल्या जमीनदारासारखी झाली आहे या पवारांच्या विधानाशी असहमत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पवारांच्या विधानाशी मी असहमत आहे. त्यांच्या विधानाचा काहीच परिणाम होणार नाही. विरोधकांनी या विधानाचा कितीही राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला तरी काँग्रेसचं काही नुकसान होणार नाही. पण अपेक्षा अशी आहे की, या विचाराचे जे आहेत. राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वाशी जे बांधिल आहेत. त्यांनी अशी टीका करण्यापेक्षा बरोबर यावं. एकत्रं यावं. काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं आणि लोकशाही तसेच राज्यघटना टिकवण्यासाठी एकत्रं लढाई करावी, असं आवाहन थोरात यांनी केलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post