युपीमध्ये पुन्हा 'योगी' सरकार तर पंजाबमध्ये 'आप'चा कॉंग्रेसला ताप; सर्वेक्षण..

 युपीमध्ये पुन्हा 'योगी' सरकार तर पंजाबमध्ये 'आप'चा कॉंग्रेसला ताप; सर्वेक्षण..मुंबई : पुढील वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज आणि सी व्होटरने एक सर्वे केलाय. या सर्वेनुसार उत्तर प्रदेशात भाजपला 259 ते 267 जागा मिळतील. तर समाजवादी पक्षाला 109 ते 117, बसपाला 12 ते 16, तर काँग्रेसला 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. या नुसार उत्तर प्रदेशातील सत्ता भाजप राखेल. मात्र, त्यांच्या संख्येत मोठी घट होऊन समाजवादी पक्षाला मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

तिकडे पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता या सर्वेक्षणातून व्यक्त केली गेलीय. पंजाबमध्ये काँग्रेसला 38 ते 46 जागा मिळू शकतात. तर आम आदमी पक्ष पंजाबमध्ये मोठी उभारी घेण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणात पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला 51 ते 57 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. सर्वेक्षणानुसार पंजाबमधील लोक 18 टक्के लोक कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी पाहू इच्छितात. तर 22 टक्के लोक अरविंद केजरीवाल यांना पसंती देत आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post