राजेशाही बडदास्त असलेल्या 21 कोटींच्या 'सुल्तान'चा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

 राजेशाही बडदास्त असलेल्या  21 कोटींच्या 'सुल्तान'चा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचंढीगड : हरियाणामध्ये 'सुल्तान' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेड्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या रेड्याची किंमत जवळपास 21 कोटी रुपये होती आणि हा रेडा त्याच्या मालकाला कोट्यवधी रुपये कमवून देत असे. राजस्थानच्या पुष्करमध्ये दरवर्षी भरणाऱ्या जनवरांच्या जत्रेत एका आफ्रिकन शेतकऱ्याने 'सुल्तान'साठी कोट्यवधी रुपयांची बोली लावली होती. एवढी मोठी बोली लागूनही सुल्तानच्या मालकाने त्याला विकण्यास नकार दिला होता.

 सुल्तान गेल्याचं दु:ख मालक नरेश त्यांच्यासाठी मोठं आहे. सुल्तान गेल्यानंतर आणखी एक रेडा घेऊन त्याला मोठं करु, पण सुल्तानची जागा कुणीही घेऊ शकत नाही, असं नरेश सांगतात.

सुल्तान' रेडा 6 फूट उंच होता. त्याचे वजन 1.5 टन होते. 'सुल्तान' एका दिवसात 10 किलो दूध, 15 किलो सफरचंद, 20 किलो गाजर, 10 किलो धान्य आणि 10-12 किलो हिरवी पाने खात असत. सुल्तानला दारू देखील पाजली जात असे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post