मोठी बातमी...नवज्योत सिंग सिद्धू यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडले...

 

मोठी बातमी...नवज्योत सिंग सिद्धू यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडले...चंदीगड: कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर  नवज्योत सिंग सिद्धू यांनीही पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यात चरणजीतसिंग चन्नी यांच्या नेतृत्वात नवं सरकार आल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

नवज्योतसिंग सिद्धू यांनी थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे हा राजीनामा पाठवला आहे. मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. परंतु, पंजाब काँग्रेसच्या वाढीसाठी मी कार्यरत राहील. काँग्रेसचा विकासाबाबत मी कोणतीही तडजोड करणार नाही, असं सिद्धू यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं असलं तरी काँग्रेसमध्ये सक्रिय राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केल्याने ते काँग्रेसमध्येच राहणार असून पक्षांतर करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post