पुढच्या वेळी श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचा आमदार....


पुढच्या वेळी श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचा आमदार : जयंत पाटीलश्रीगोंदा:  'राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा - संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी!' या संवाद दौऱ्याच्या तिसऱ्या पर्वातील सहाव्या दिवशी आज श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री मा. जयंत पाटील यांनी घेतला. यावेळी त्यांनी फ्रंटल संघटना आणि प्रत्येक सेलच्या कार्यकारिणीकडून संघटनेच्या कामाची माहिती घेतली. तसेच पुढच्या निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादीचाच आमदार निवडून आला पाहीजे, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. 


यावेळी आमदार निलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, घनश्याम शेलार, राहुल जगताप, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, अहमदनगर निरीक्षक अंकुश काकडे, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष हरीदास शिर्के, महिला जिल्हा अध्यक्ष मंजुषा गुंड, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, युवती जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गजानन भाडवंलकर आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post