मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित करूणा शर्मा परळीत दाखल...गाडीत पिस्तूल सापडल्याने खळबळ


मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित करूणा शर्मा परळीत दाखल...गाडीत पिस्तूल सापडल्याने खळबळबीड : सोशल मीडियावर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टिकेची झोड उठवत करुणा शर्मा आज  बीडमधील परळी शहरात करुणा शर्मा दाखल झाल्या असून त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तूल आढळून आले आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे पिस्तूल त्यांचेच आहे का तसेच याचं त्यांच्याकडे लायसन्स आहे का याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

परळी मध्ये करुणा शर्मा दाखल झाल्यानंतर वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवलं. तसेच घेराव घालण्याचा प्रयत्न केला. वैजनाथाच्या दर्शनासाठी करुणा मुंडे पोहोचल्या मात्र या ठिकाणी आमच्या साहेबाला बदनाम करायला आलात का? असा सवाल करत परळीच्या महिलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला

मी फक्त दर्शनासाठी आले असल्याचे सांगत करुणा मुंडे म्हटलं, मला गावात यायला का अडवता? असा प्रश्न उपस्थित करत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र परळीच्या महिलांसह अनेक नागरिक आक्रमक झाल्यामुळे रस्त्याने परत जात असताना गाडी अडवली.

पोलिसांनी त्यांना परळी पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post