विखे पाटील यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले... भाजपचा विजय संकल्प मेळावा

 

विखे पाटील यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले... भाजपचा विजय संकल्प मेळावाशिर्डी:   राज्य सरकारकडून लोकांना अपेक्षा राहिलेल्या नाहीत. एकीकडे परमिट रूम, बार, मॉल, लोकल प्रवास अशी गर्दीचे ठिकाणे सुरू आहेत. मात्र शाळा आणि मंदिरे बंद ठेवले आहेत. देव मंदिरात कोंडण्याचे महापाप आघाडी सरकारने केले असून या सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर मांडून आगामी शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुकीत  सतरा विरुद्ध शून्य असा निकाल हाती घेऊन नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा  फडकविणार असल्याची ग्वाही आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.


भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा आगामी शिर्डी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयी संकल्प मेळावा शिर्डी येथे संपन्न झाला. याप्रसंगी आ. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. यावेळी उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, कैलासबापू कोते, नगरसेवक अभय शेळके, सुजित गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते, मंगेश त्रिभुवन, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, अ‍ॅड. अनिल शेजवळ, रवींद्र गोंदकर, नगरसेवक रवींद्र कोते, शिर्डी सोसायटीचे चेअरमन विजयराव कोते व सर्व संचालक, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार, गणेश कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, संचालक मधुकर कोते, भाजपाचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन शिंदे, रामभाऊ कोते, शामभाऊ कोते, अशोक गायके, प्रमोद गोंदकर, अरविंद कोते, सोमनाथ कावळे, साईराज कोते, विनायक कोते, सुधीर शिंदे, देवानंद शेजवळ, किरण बोराडे, सचिन भैरट, नरेश सुराणा, अजय नागरे आदींसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.


आ. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, शिर्डीचे अर्थकारण साई मंदिरावर अवलंबून आहे. मंदिर बंद असल्याने अनेकांचा रोजगार गेला. महाराष्ट्रात धार्मिक स्थळे बंद असतांना इतर राज्यातील धार्मिक तीर्थस्थळे सुरू आहे. तिरुपतीचे बालाजी मंदिर भाविकांसाठी सुरू आहे. बालाजीला दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांना करोना होत नाही, मात्र शिर्डीला येणार्‍यांना भाविकांना त्रास होतो की काय? असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.


गर्दीची सर्व ठिकाणे सुरू केली आहेत. लोकलने दररोज सुमारे 50 लाख लोक प्रवास करत आहेत. अशा ठिकाणी सरकार परवानगी देते, मात्र मंदिरे बंद ठेवली जातात. शिर्डीतील नोंदणीकृत दुकानदार व्यावसायिक, हातगाडीवाले या सर्वांचा व्यावसायिक कर शासनाने माफ करावा व त्याबदल्यात नगरपंचायत नगरपालिकांना शासनाने अनुदान द्यावे. कर्जाचे हप्ते पाडून मिळावे यासाठी आपण केंद्र सरकारला विनंती करणार आहोत. पंतप्रधानांची भेट घेऊन धार्मिक तीर्थस्थळांवर अर्थकारण अवलंबून असलेल्या राज्यातील सर्वच ठिकाणच्या व्यावसायिकांना व्यवसायिक करातून शंभर टक्के सूट व बँकांच्या कर्जाच्या हप्त्यात दिलासा देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post