३० लाखांच्या कर्जापोटी ६१ लाखांची वसुली, तरीही हाव सुटेना... सावकारी करणारे पितापुत्र गजाआड

 ३० लाखांच्या कर्जापोटी ६१ लाखांची वसुली, तरीही हाव सुटेना... सावकारी करणारे पितापुत्र गजाआडसांगली :  मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकास 30 लाखाचे सावकारी कर्ज देऊन त्या मोबदल्यात 7 टक्के व्याजाने महिन्याला 2 लाख रुपये घेतले. 61 लाखाची वसुली केल्यानंतर देखील आणखी 50 लाख आणि प्लॉट नावावर करण्यासाठी धमकावल्याने पोलिसांनी सावकार शैलेश रामचंद्र धुमाळ आणि त्यांचा मुलगा आशिष शैलेश धुमाळ यांच्या घरावर छापा टाकून त्यांना अटक केली आहे.

धुमाळ पितापुत्रांनी म्हैसाळ येथील अशोक कोरवी यांना 30 लाखाचा धनादेश दिला होता. त्या बदल्यात महिन्याला 7 टक्के व्याजाने 2 लाख 10 हजार रुपये वसूल केले होते. तसेच स्थानिक कर्जदार म्हणून महिन्याला आणखी 2 लाख रुपयांची मागणी करून 25 लाख रुपयांचा धनादेश घेतला होता. 30 लाख रुपयांच्या कर्जापोटी 61 लाख रुपयांची वसुली करून देखील धुमाळ पितापुत्रांकडून कोरवी यांना धमकावून त्यांच्याकडे आणखी 50 लाखाची मागणी करून त्यांचा म्हैसाळ येथील 13 गुंठ्याचा प्लॉट नावावर करण्यासाठी तगादा लावला होता.

त्यामुळे कोरवी यांनी सावकारी सेलकडे तक्रार केली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तयार करून त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी 2 लाख 60 हजार रोख रक्कम, कोरे धनादेश आणि वाहने जप्त करण्यात आली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post