विखे-पाटील माझ्या‌ अगोदरचे शिवसैनिक, त्यांनी माझ्या बरोबर यावं, शिवसेना मंत्र्याने दिलं निमंत्रण

 विखे-पाटील माझ्या‌ अगोदरचे शिवसैनिक, त्यांनी माझ्या बरोबर यावं, शिवसेना मंत्र्याने दिलं निमंत्रणनगर :   शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील नगर जिल्ह्यात एकाच मंचावर पाहायला मिळाले. राहता तालुक्यातील कोल्हार इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या भूमिपूजनानिमित्त हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर आले होते. बांधा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर कोल्हारमधील जिल्हा परिषद शाळेची उभारणी केली जात आहे. या कार्यक्रमावेळी दोन्ही नेत्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

भाषणावेळी विखे पाटील यांनी सत्तार हे माझे जूने मित्र असल्याचं सांगितलं. राजकारणाच्या पलिकडे आपण मैत्री जपतो. विकासाच्या कामात पक्षीय राजकारणाच्या पलिकडे विचार करावा लागतो. 

यावेळी अब्दुल सत्तार यांनीही जोरदार भाषण केलं. विखे कुटूंब यांचे राहणीमान अगदी साधे आहे. पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा कामाने श्रीमंत होणे हा कानमंत्र मी विखे-पाटील कुटूंबाकडून शिकलो. मी कोणत्याही संकटात विखे-पाटील यांचा सल्ला घेतो. राजकारणात मी मोठा झालो त्यासाठी विखे पाटील यांचे विखे-पाटील माझ्या‌ अगोदरचे शिवसैनिक. त्यांना मी माझ्यासोबत येण्याचे निमंत्रण देतो, अशी टिप्पणीही सत्तार यांनी भाषणाच्या शेवटी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post