महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी होते चक्क ‘चोर गणपती’ची स्थापना...200 वर्षांची परंपरा

 सांगली : गणेश चतुर्थीला सर्वत्र थाटामाटात गणेशाचे आगमन होते. सांगलीत मात्र चार दिवस अगोदर गणेशाचे आगमन होते. कोणालाही माहिती न पडता गणेशाची स्थापना होते. या प्रथेला चोर गणपती म्हणतात. सांगलीमध्ये गेल्या दोनशे वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. चोर गणपतीची मूर्ती कागदी लगद्यापासून बनवली गेली आहे. तर हा गणपती दीड दिवस असतो. या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही जतन केले जाते. या मूर्तीला सुरक्षित ठिकाणी ठेवले जाते.गणेश चतुर्थीच्या चार दिवस आगोदर चोर गणपती प्रतिष्ठापना केली जाते. चोर गणपती बसवण्याची सांगली येथे शतकाची परंपरा आहे. आज सांगलीच्या गणपती मंदिरात चोर गणपतीची प्रतिष्ठापित झाली. श्री गजानन हे सांगलीचे आराध्य दैवत असून सर्व धर्मियांचे ते श्रद्धास्थान आहे. चोर गणपती बसवण्याची येथे शतकाची  परंपरा आहे. गणेश चतुर्थीच्या चार दिवस आगोदर या गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. श्री गणपती पंचायतन संस्थानच्या सांगलीतील प्रसिध्द गणपती मंदिरात हा चोर गणपती बसवला जातो. मात्र, कोरोनाच्या या महामारीत मंदिर बंद असल्याने भक्तांनी बाप्पाचे बाहेरुनच दर्शन घेतले. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post