भुजबळांची आरोपातून मुक्तता.... नगरमध्ये समता सैनिकांचा जल्लोष

 

भुजबळांची आरोपातून मुक्तता.... नगरमध्ये समता सैनिकांचा जल्लोषनगर: महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ,माजी खासदार समीर भुजबळ मा.आमदार पंकज भुजबळ आणि इतरांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. महाराष्ट्र सदन प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाली त्याबद्दल आ भा महात्मा फुले समता परिषद अहमदनगरच्या वतीने माळीवाडा चौक येथे फटाके फ़ोडुन नागरिकाना पेढे भरवुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

 यावेळी समता परीषदे प्रदेश सरचिटणीस अंबादास गारूडकर,विभागीय अध्यक्ष मछिंद्र गुलदगड,महानगराध्यक्ष दत्ता जाधव,  जिल्हा अध्यक्ष सुभाष लोंढ़े,उत्तर जिल्हा अध्यक्ष प्रशांत शिंदे जिल्हा परिषद सदस्य शरदभाऊ झोडगे,नगरसेवक बाळासाहेब बोराटे,ओबीसी शहरअध्यक्ष बाळासाहेब भुजबळ,वीनायकराव नेवसे,बजरंग भूतारे,विष्णुपंत म्हस्क़े,प्रसाद शेरकर,अशोकराव गोरे साहेब,जिल्हा संघटक जलिंदर बोरूडे, नाना लोखंडे,  अमित पडोळे आदि सह समता सैनिक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post