खळबळजनक...शिर्डी साईबाबा संस्थानचे अधिकारी, कर्मचारी अटकेत


शिर्डी साईबाबा संस्थानचे अधिकारी, कर्मचारी अटकेत शिर्डी : शिर्डी येथील साईबाबा मंदिरात  संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश हे साई मंदिरात उपस्थित असल्याचे फोटो काही दिवसांपूर्वी सोशल माध्यमात व्हायरल केले म्हणून संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांना अटक करण्यात आल्याची घटना घडली आहे. राजेंद्र जगताप यांच्यासह पाच जणांना अटक झाल्याचे वृत्त शिर्डीत पसरताच मोठी खळबळ निर्माण झाली आहे

 साईबाबा मंदिर व परिसरात सध्या कोरोनामुळे साईभक्तांना बंदी आहे, तसंच साई मंदिराची सुरक्षा ध्यानात घेऊन शिर्डीतील साई मंदिरातील कोणाचेही फोटो किंवा व्हिडिओ बाहेर सोशल माध्यमावर व्हायरल करणे हे गुन्हा आहे, तसा साई संस्थान ने 2018 मध्ये ही नियमच केला होता. शासनानेही यासंदर्भात संस्थांनला सूचना केल्या होत्या. मात्र, या नियमाचा भंग करत संस्थान प्रशासनाने व त्यांच्या अधिकाऱ्यांनी शिर्डीत साई मंदिरामध्ये 31 ऑगस्ट 20 21 रोजी श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश आणि समितीचे सदस्य धर्मदाय आयुक्त अहमदनगर हे उपस्थित असल्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते. हे फोटो व्हायरल झाल्यामुळे प्रधान जिल्हा न्यायाधीश तसा धर्मादाय आयुक्त यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता, तशी तक्रारही सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली होती.

या तक्रारीनंतर साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांच्यासह अजित जगताप, विनोद कोते, राहुल फुंदे, सचिन गव्हाणे आणि चेतक साबळे या सर्वांवर मंदिर सुरक्षा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post