कर्जत जामखेड मतदारसंघात राजकीय भूकंप, नामदेव राऊत यांची भाजपला सोडचिठ्ठी

 

कर्जत जामखेड मतदारसंघात राजकीय भूकंप, माजी राम शिंदे यांना जोर का झटका.... नामदेव राऊत यांची भाजपला सोडचिठ्ठीनगर : कर्जत नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष आणि नगरसेवक नामदेव राऊत यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक आणि सक्रीय सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. नामदेव राऊत हे लवकरच आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही माहिती मिळत आहे. यापूर्वी भाजपचे संघटन सरचिटणीस प्रसाद बापूसाहेब ढोकरीकर यांनीही पदाचा राजीनामा दिला होता. माजी मंत्री राम  शिंदे यांना हा दुसरा मोठा झटका मानला जातोय. 


नामदेव राऊत हे माजी मंत्री राम शिंदे आणि खासदार सुजय विखे-पाटील यांचे खंदे समर्थक मानले जात होते. मात्र, राऊत हे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवारांच्या या खेळीमुळं राम शिंदे यांनी सुजय विखे-पाटील यांना हा मोठा धक्का असणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post