पंतप्रधान रामबाण सुरक्षा योजने अंतर्गत तरूणांना मिळणार ४ हजार रुपये ! , समोर आला मोठा खुलासा

पंतप्रधान रामबाण सुरक्षा योजने अंतर्गत तरूणांना मिळणार ४ हजार रुपये ! , समोर आला मोठा खुलासा



नवी दिल्ली:  अलीकडेच एक बातमी पसरली की, कोरोनावरील उपचारांसाठी एका शासकीय योजनेअंतर्गत केंद्र सरकार सर्व रूग्णांना 4000 रुपयांची मदत करत आहे.

,सोशल मीडियावर फिरणारा स्क्रीनशॉट हा व्हॉट्सअॅप चॅटमधील मेसेज आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. खाली लिहिले आहे की, पंतप्रधान रामबाण सुरक्षा योजनेसाठी नोंदणी केली जात आहे. या योजनेअंतर्गत सर्व तरुणांना मदत म्हणून 4000 रुपये मिळतील. नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि आपला फॉर्म भरा.


पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने या व्हायरल मेसेजची चौकशी केली आणि सत्य बाहेर आणले. पीआयबीच्या मते हा दावा खोटा आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबवली जात नाही. अशा बनावट वेबसाइटवर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post