जिल्ह्यात २४ सप्टेंबर पर्यंत 'या' गोष्टींवर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  


 पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचेकडील पत्र क्र.जिविशा/प्रतिबंधात्मक आदेश/7742/2021

दि.09/09/2021 रोजीचे पत्राचे पत्रानुसार, 'सध्या जगभरात व राज्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट चालु आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोविड रुग्ण इतर जिल्ह्याच्या तुलनेनुसार जास्त वाटत असल्याचे दिसुन येत आहे. शासनाकडील ब्रेक द चेन सुधारित मार्गदर्शक सुचना नुसार या कार्यालयाकडील आदेशामध्ये कोविड अॅप्रोप्रिएट बिहेविअरचे पालन करणे बाबतचे आदेश अहमदनगर जिल्ह्यासाठी दि.15/08/2021 पासुन पुढील आदेश होईपावेतो आदेशीत केले आहेत. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 | कलम 144 चे आदेश यापूर्वी निर्गमित केले होते ते आता शिथील करण्यात आले आहे. तसेच आगामी काळात गणेशोत्सव दि.10/09/2021 ते दि.19/09/2021 या कालावधीत साजरा केला जाणार आहे.

गणेशोत्सवा दरम्यान समाजकंटक व गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून किरकोळ कारणावरुन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाकडून मिरवणूकीत, धार्मिक कार्यक्रमात गर्दी करु नये तसेच गणेश मूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष दर्शन घेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. याबाबत शासनाने सार्वजनिक गणेश मंडळांना सूचना दिलेल्या आहेत.

शासनाच्या मिरवणूक मनाई प्रत्यक्ष मुखदर्शन न घेणे बाबतच्या आदेशा विरुध्द विविध संघटना, राजकियपक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी करुन प्रशासनास वेठीस धरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जिल्ह्यामध्ये विविध राजकिय पक्ष, कामगार संघटना तर्फे त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चे, धरणे आंदोलने, रस्ता रोको कार्यक्रम घेवून मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर अहमनगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणुन पोलीसांना कर्तव्य बजावतांना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) चे अन्वये दि.10/09/2021रोजीचे 00.01 वा.पासुन ते दि.24/09/2021 रोजीचे 24.00 वा.पावेतो प्रतिबंधात्मक आदेश जारी करणेबाबत

पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी त्यांचेकडील दि.09/09/2021 रोजीचे पत्राअन्वये विनंती केली आहे.

त्याअर्थी, वरील पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे अनुषंगाने

पोलीसांना कर्तव्य बजावतांना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या

हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम 37(1)(3) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी करणेबाबत पोलीस

अधीक्षक, अहमदनगर यांनी दि.09/09/2021 चे पत्रान्वये विनंती केली व तशी माझी खात्री झालेवरुन मी

जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर मला महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम 37 (1)(3) नुसार प्राप्त झालेल्या

अधिकाराचा वापर करुन आदेशात नमूद केलेल्या कालावधीत कोणाही इसमास खालील कृत्ये करण्यास मनाई

करीत आहे.

अ) शस्त्रे, काठ्या, सोटे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, दंडे अगर लाठ्या किंवा शारिरीक इजा करणेसाठी वापरता

येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे.

ब) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे व साधणे जवळ

बाळगणे किंवा तयार करणे किंवा जमा करणे,

क) कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे,

ड) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे.

इ) जाहीरपणे घोषणा देणे.

ई) सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे,

आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तरी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तु तयार

करणे किंवा त्यांचा प्रचार करणे.

फ) सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेणेस, मिरवणुका

काढणेस मनाई करीत आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post