बाळासाहेब म्हणाले मी जाहीर करू का? आयुष्यातील पहिले भाषण...राज ठाकरे यांनी सांगितली आठवण...

बाळासाहेब म्हणाले मी जाहीर करू का? आयुष्यातील पहिले भाषण...राज ठाकरे यांनी सांगितली आठवण... पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात एका कार्यक्रमात आपल्या पहिल्या भाषणाचा किस्सा उपस्थितांना सांगितला. ते म्हणाले की, “१९९२ साली संपूर्ण शिवतीर्थ भरले होते. मी बाळासाहेबांच्या बाजूला बसलो होतो. अनेक नेते मंडळी देखील उपस्थित होते. तेवढ्यात बाळासाहेब म्हणाले, तू बोलणार आहेस ना(आम्ही आरे तुरे मध्ये बोलायचो) मी म्हटले तू काहीतरी बोलू नकोस हा…. नाही तर मी व्यासपीठावरून निघून जाईल. 

त्यावर बाळासाहेब म्हणाले, नाही नाही तू आज बोललंच पाहीजे. हे सर्व आम्हा दोघांचे सुरू असताना बाळासाहेब एकदम म्हणाले तू बोलतोयस की मी जाऊन जाहीर करू. अशाप्रकारे इतक्या लोकांसमोर माझ्या आयुष्यातील पहिले भाषण मी शिवतीर्थावर दिले. तोपर्यंत माझी पुढे जाऊन बोलायची हिंमत होत नव्हती. मी कधी बोलू शकेल आणि भाषण करू शकेल. यावर माझा कधीच विश्वास देखील नव्हता.” राज ठाकरेंनी सांगितलेल्या या आठवणीवर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजून दाद दिली.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात शिवशाहीर करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या अंतिम सोहोळ्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post