राहुरीत तनपुरे यांचा भाजपला दे धक्का... नगरसेवकाचा समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश

 राहुरीत तनपुरे यांचा भाजपला दे धक्का... नगरसेवकाचा समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेशराहुरी : राहुरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे कट्टर समर्थक नगरसेवक शहाजी जाधव (ठाकूर) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ राहुरी मतदारसंघातील धनगरवाडीचे (ता. नगर) सरपंच किशोर शिकारे यांनी चार ग्रामपंचायत सदस्यांसह भाजपला सोडचिठ्ठी देऊन, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. 

आज (शनिवारी) अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा झाला. जिल्हा सरचिटणीस सुनील आडसुरे, राहुरीचे नगराध्यक्ष अनिल कासार, रोहिदास कर्डिले, प्रकाश भुजाडी, बाळासाहेब उंडे, दशरथ पोपळघट, संजय साळवे, राष्ट्रवादी कला, सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. श्याम शिंदे उपस्थित होते.

मी नगराध्यक्ष असताना श्री. शहाजी जाधव यांच्याशी माझा परिचय झाला. सर्वसामान्य जनतेसाठी झगडणारा नेता ही त्यांची प्रतिमा आजही कायम आहे. पक्ष संघटनेसाठी, राहुरीच्या विकासासाठी आम्ही सोबत जोडले गेलो आहोत ही समाधानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया तनपुरे यांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post