शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे...मंत्र्यांची अजून मोठी यादी आहे

 नागपूर : परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरिता नोटीस बजावली होती. मात्र, परब ईडी कार्यालयाकडे फिरकलेच नाही. त्यांनी ईडीकडे उपस्थित राहण्यासाठी 14 दिवसांचा अवधी मागून घेतलाय. त्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय. शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे. अनिल परब यांनी ईडी चौकशीसाठी हजर राहायला हवं होतं, असा टोला चंद्रकांत पाटील यांना लगावलाय. 

सर्वसामान्य माणसांना लगेच अटक होते. मग अनिल परब यांनी कितीही व्यस्त असलं तरी ईडी चौकशीला हजर राहायला हवं होतं. अनिल देशमुखांचंही असंच चाललं आहे. शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे. रांगेनं एक-एक मंत्री आहे. आधी राठोड गेले, मग देशमुख आणि आता अनिल परब. मंत्र्यांची अजून मोठी यादी आहे. काही जण सुपात आहेत, तर काही जण जात्यात, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिलाय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post