पाथर्डी तालुका काँग्रेसमध्ये 'इनकमिंग', मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले स्वागत

 पाथर्डी तालुका काँग्रेसमध्ये 'इनकमिंग', मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले स्वागत  नगर:  राज्याचे महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात  यांनी प्रा. दादासाहेब खेडकर यांची अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी  व बाबासाहेब वाघ यांची पाथर्डी तालुका काँग्रेसच्या एन .टी. विभागाच्या अध्यक्ष पदी निवड करून नियुक्तीपत्र दिले.  महेंद्र सोलाट युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस, श्री गोरे  तालुका काँग्रेस  उपाध्यक्ष,  महेश दौंड युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष ,लक्ष्मण फुलमाळी युवक काँग्रेस तालुका सरचिटणीस अशोक फुलमाळी  , तालुका युवक काँग्रेस सरचिटणीस गणेश शिंदे, उपाध्यक्ष आदींचा सन्मान करून अनेक तरुणांना ,युवकांना  पक्षामध्ये प्रवेश देऊन त्यांचा सर्वांचा सन्मान केला., तालुक्यामध्ये पक्ष निश्चितच दिमाखदार यश संपादित करेल असा विश्वास ना. थोरात यांनी व्यक्त केला. तालुका अध्यक्ष नासिर शेख यांनी यावेळी स्पष्ट सांगितले की पक्षाची घोडदौड आणि संघर्ष यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि सहकारी यांच अमूल्य असं योगदान , प्रचंड मेहनत आणि सहकार्य हेच कारणीभूत असून याच बळावर आम्ही तालुक्यामध्ये पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. 

याप्रसंगी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक  गणपतराव सांगळे , पाथर्डी तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस कार्याध्यक्ष नासिर शहानवाज शेख, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष रवी पालवे जिल्हा काँग्रेस प्रतिनिधी नवाबभाई शेख, पाथर्डी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रकाश शेलार,   सचिनदादा राजळे गणेश दिनकर , असलम सय्यद,  शरद पवार , ज्येष्ठ नेते राजेंद्र मामा तागड, उपस्थित होते*....

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post