महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद ठेवावी, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाला भाजपची हरकत

 

महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद ठेवावी, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाला भाजपची हरकतपुणे  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परप्रांतीयांना उद्देशून दिलेल्या आदेशाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला. त्यांनी एखाद्या समाजाला लक्ष्य करणे योग्य नाही, असे म्हणत परप्रांतियांची एका प्रकारे पाठराखण केली आहे. ते मंगळवारी पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. 

मुंबई येथील साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयात आयोजित बैठकीत महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे सांगितले. तसेच परप्रांतातून येणाऱ्या लोकांच्या नोंदी ठेवण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. राज्यात बाहेरून कोण येतो, कोठून येतो, कोठे जातो याची नोंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. याविषयी पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आले. यावर बोलताना केवळ परप्रांतीयच अशा प्रकारचे गुन्हे करतात का, याचा विचार करावा. अशा प्रकारे एखाद्या समाजाला टार्गेट करण्यात काही अर्थ आहे, असे आपल्याला वाटत नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post