राष्ट्रीय महामार्गाला भल्या मोठ्या भेगा... पंकजा मुंडे लिहिणार गडकरींना पत्र

राष्ट्रीय महामार्गाला भल्या मोठ्या भेगा... पंकजा मुंडे लिहिणार गडकरींना पत्र मुंबई :  पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर  भेगा पडल्या असून आपण यासंदर्भात नितीन गडकरींना पत्र लिहिणार असल्याचे माजी मंत्री पंकजा मुंडेंनी म्हटले आहे. 

राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे चांगल्या सक्रिय बनल्या आहेत. त्यांनी आज ट्वीट करून पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या भल्या मोठ्या भेगचा फोटो शेअर केला. इतकेच नव्हे तर यासंदर्भात नितीन गडकरींना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्या पत्रात नेमके काय म्हणणे मांडताहेत, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग 752 ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिणार आहे, असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे. रस्त्याच्या बांधकामात झालेली चूक गडकरी यांनाही हे अजिबात चालणार नाही. तात्काळ दखल घेतली जाईल’, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post