माजी मंत्री पंकजा मुंडे यांना धक्का... वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष व संचालक राष्ट्रवादीत दाखल

 

 माजी मंत्री पंकजा मुंडे यांना धक्का... वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष व संचालक राष्ट्रवादीत दाखलपरळी : भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मोठा धक्का दिलाय. गोपीनाथराव मुंडे आणि पंडितअण्णा मुंडे यांचे जुने आणि निकटचे सहकारी, तथा माजी मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय. 

वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांच्यासह 5 संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं पंकजा मुंडे आणि भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. तर धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे आणि पंडित अण्णांचे सहकारी आज आपल्यासोबत आल्याचा आनंद असल्याचे म्हटले आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्या दरम्यान आयोजित कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी नामदेवराव आघाव यांच्यासह वैद्यनाथ कारखान्याचे संचालक माधवराव मुंडे, अश्रूबा काळे, भाऊसाहेब घोडके, माऊली मुंडे, किसनराव शिनगारे, पांडुरंग काळे यांच्यासह सेवा सहकारी सोसायटी पांगरीचे महादेव मुंडे, महादेव सदाशिव मुंडे, मोहन गित्ते यांसह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post