मोदींकडून भगिनींना रक्षाबंधनानिमित्त गॅस दरवाढीची ओवाळणी, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसकडून मोदींना 'हे' रिटर्न गिफ्ट

मोदींकडून भगिनींना रक्षाबंधनानिमित्त गॅस दरवाढीची ओवाळणी, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसकडून मोदींना रिटर्न गिफ्ट  पुणे: काही दिवसांपूर्वी देशातील आपल्या सर्व भगिनींना मोदी सरकारने गॅस सिलेंडरचे भाव २५ रुपयांनी वाढवून रक्षाबंधनाची ओवाळणी दिली. वर्षभरात  सन्माननीय पंतप्रधान मोदीजी अधूनमधून आपल्या बहिणींनाही ही ओवाळणी महागाईच्या स्वरूपात देतच असतात. 

याच प्रेमाखातर आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेसमार्फत राज्यभरातून आपल्या प्रधानसेवकांना रक्षाबंधनाचं रिटर्न गिफ्ट म्हणून शेणाच्या गोवऱ्या पाठवल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली.

अच्छे दिनांची खोटी स्वप्न दाखवून जनतेच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या या भावाला ह्या गोवऱ्या महागाईचे प्रतिक म्हणून भेट दिल्या आहेत. 

महिलांच्या स्वास्थ्याचा विचार करून मोठ्या मनाने आपल्या प्रधानसेवकांनी उज्वला गॅस योजना आणली, परंतु फक्त योजना आणून पोट भरत नसतं. दर १५ दिवसांनी स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर वाढतोय. त्यामुळे ज्या उद्देशाने ही योजना सुरू झाली त्याचा मूळ हेतूच नष्ट झाला आहे. आता महिलांना पुन्हा चुलीकडे चला अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

   सात वर्षांत गॅस सिलिंडरची दरवाढ दुप्पटीने वाढली आहे,कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्य माणूस आर्थिक, शारीरिक व मानसिकदृष्ट्या खचलेला आहे,त्याला आधार देण्याऐवजी दर पंधरा दिवसांनी गॅस, पेट्रोल  डिझेल दरवाढ करून केंद्र सरकार सर्वसामान्य माणसाच्या जखमेवर मीठ चोळत आहे.

   

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post