आपल्याच कार्यालयातील निवृत्त कर्मचार्याकडून १० हजारांची लाच, PWD तील २ लिपिक 'एसीबी'च्या जाळ्यात

 

आपल्याच कार्यालयातील निवृत्त कर्मचार्याकडून १०  हजारांची लाच, PWD तील २ लिपिक 'एसीबी'च्या जाळ्यातनाशिक : नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयातील दोन लिपिकांनी त्याच कार्यालयातून निवृत्त झालेल्या कर्मचार्याकडे लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.  या दोनही लिपिकांना १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात एसीबीच्या अधिकाऱ्यांना यश आलं आहे.

तक्रारदार निवृत्त कर्मचारी हे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होते. त्यांना पेन्शन, सेवापुस्तक पडताळणी आणि रजेतील फरकांचे बिल यासह अनेक कामं करायची होती. पण कार्यालयातील कार्यरत कर्मचारी काहीना काही कारण देत त्यांना परत पाठवत असत. अनेक दिवस कार्यालयाच्या पायऱ्या चढूनही काम न झाल्याने तक्रारदार चिंताग्रस्त झाले होते. या दरम्यान कार्यालयातील मुख्य लिपिक आणि वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या इसमांनी त्यांचं काम करण्यासाठी 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे त्याने एसीबी कार्यालयात जावून अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. 

एसीबी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर निवृत्त कर्मचारी कार्यालयात गेला. त्याने मुख्य लिपिक प्रवीण पिंगळे आणि वरिष्ठ लिपिक शांतराम लहाने यांना दहा हजारांची लाच दिली. याचवेळी एसीबीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही लिपिकांना अटक केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post