आ. संग्राम जगताप यांनी केला UPSC टॉपर विनायक नरवडे याचा सत्कार

 

आ. संग्राम जगताप यांनी केला UPSC टॉपर विनायक नरवडे याचा सत्कारनगर: अमेरिकेतील नोकरी सोडून पुन्हा भारतात येऊन विनायक कारभारी नरवडे याने UPSCचा अभ्यास करत UPSC परीक्षेत महाराष्ट्रात २ रा तर देशात ३७ वा क्रमांक पटकावत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.

जिद्द, मेहनत आणि कठोर परिश्रमातून हे यश मिळवणारा अहमदनगर शहराचा सुपुत्र विनायक कारभारी नरवडे याचे व त्याच्या पालकांचे आ.संग्राम जगताप यांनी   अभिनंदन करून समस्त नगरकरांच्या वतीने त्यांचा सत्कार केला.

याप्रसंगी कारभारी नरवडे, उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, अमोल गाडे, शाम नरवडे, नेवासा पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार, नेवासा फाटा सरपंच दादा निपुंगे आदी मान्यवर उपस्थित होते.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post