पुणे-अहमदनगर मेट्रो प्रकल्प... केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची अभिनव संकल्पना


पुणे-अहमदनगर मेट्रो प्रकल्प... केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची अभिनव संकल्पना पुणे:  पुण्यातल्या एका कार्यक्रमाप्रसंगी भाषण करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विकासाची ब्लू प्रिंट म्हणजे नेमकी काय असते, हे दाखवून दिलं. पुणे शहरातून 4 शहरांत मेट्रो जाऊ शकतात आणि ते ही कमी खर्चात, असं स्वप्न बोलून दाखवताना गडकरींनी 4 शहरांसाठी अफलातून मेट्रो प्रकल्प सांगितला.

ते म्हणाले, नागपूर मेट्रोची निर्माण किंमत 350 कोटी रुपये प्रति किलोमीटर आहे तर पुणे मेट्रोची निर्माण किंमत 380 कोटी रुपये प्रति किलोमीटर , पण एक नवीन मेट्रोची संकल्पना आहे. ह्या मेट्रोची निर्माण किंमत फक्त एक कोटी रुपये प्रति किलोमीटर अशी राहील. मी कन्सलटेन्ट म्हणून फुकट काम करायला तयार आहे

ही मेट्रो सध्याच्या ब्रॉडगेज रेलवे ट्रॅकवर धावेल आणि  यासाठी भारतीय रेल्वेसोबत मीटिंग सुद्धा झाली आहे. आम्ही हा प्रकल्प नागपूर परिसरात सुरु करणार आहोत, तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील आपण सुरु करु शकतो.

पुणे ते नाशिक, पुणे ते कोल्हापुर, पुणे ते अहमदनगर , पुणे ते सोलापुर अशी ही नवीन मेट्रो सुरु होउ शकते. या मेट्रोमध्ये 6 अत्याधुनिक कोच असतील आणि दोन कोच विमानासारखे असतील, असंही गडकरींनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post