खा.विखे पाटील यांनी घेतली केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट, महत्त्वपूर्ण चर्चा


खा.विखे पाटील यांनी घेतली केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट, महत्त्वपूर्ण चर्चा नगर: खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्री श्री. मनसुखजी मंडाविया यांची भेट घेतली.

भेटीदरम्यान नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत राळेगण सिद्धी येथे ७ कोटी रुपयांचे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटल येथे महिला आणि बाल विभागासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते व्हावं यासाठी त्यांना निमंत्रण देखील दिले.

यासोबतच केंद्र सरकारच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात सुरू असलेले कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण आणि PSA प्लांटचे उत्कृष्ट नियोजन तसेच जिल्ह्यातील एकंदर कोविड परिस्थिती याबाबत सविस्तर चर्चा केली.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post