भाजप आमदारची महिला अधिकार्यास घाणेरड्या भाषेत शिवीगाळ... ऑडिओ क्लिप व्हायरल...


भाजप आमदारची महिला अधिकार्यास घाणेरड्या भाषेत शिवीगाळ... ऑडिओ क्लिप व्हायरल... पुणे:  पुण्यातील भाजपचे आमदार सुनील कांबळे यांची एक ऑडिओ क्लिप  व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये कांबळे यांनी पुणे महानगरपालिकेच्या एक वरिष्ठ महिला अधिकारी सुष्मिता शिर्के यांना शिवीगाळ केली आहे. 

ड्रेनेज विभागातील काम करण्यासाठी पुणे महापालिकेतील महिला अधिकारी सुष्मिता शिर्के यांना कार्यकर्त्याच्या फोनवरून आमदार सुनील कांबळे यांनी फोन केला होता. त्यावर शिर्के यांनी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल, असं सांगितलं होतं. त्यावर कांबळे यांनी संबधित महिला अधिकाऱ्यास घाणेरडया भाषेत शिवीगाळ केली. . महिला अधिकारी आणि आमदार सुनील कांबळे यांच्यात जवळपास 2 मिनिटाचं संभाषण झालं. या संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post